सरकारी कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगापेक्षा 8व्या वेतन आयोगात कमी मिळणार पगार? 8th Pay Commission News

Published On:
सरकारी कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगापेक्षा 8व्या वेतन आयोगात कमी मिळणार पगार? 8th Pay Commission News

8th Pay Commission News केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेंशनधारकांची 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेची प्रतिक्षा लांबली असताना, नुकत्याच आलेल्या एका अहवालाने त्यांच्या आशांवर विरजण टाकले आहे. कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीजच्या रिपोर्टनुसार, 8व्या वेतन आयोगांतर्गत केवळ 13% ची प्रभावी सैलरी वाढ होण्याची शक्यता आहे जी मागील 7व्या वेतन आयोगातील 14.3% च्या तुलनेत कमी आहे.

फिटमेंट फॅक्टरमुळे अपेक्षेपेक्षा कमी वाढ?

नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर केवळ 1.8 ठरवला जाऊ शकतो, जो 7व्या वेतन आयोगातील 2.57 च्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. याचा अर्थ असा की, सध्याच्या बेसिक पे वर केवळ 80% वाढ होईल. मात्र DA (महागाई भत्ता) जो सध्या 55% आहे, तो नवीन पगार संरचनेत शून्यावर जाईल. त्यामुळे, एकूण प्रभावी सैलरी वाढ केवळ 13% एवढी मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

किती वाढू शकतो बेसिक पगार?

सध्या किमान बेसिक पगार ₹18,000 आहे. 1.8 फॅक्टरनुसार तो ₹32,000 पर्यंत जाऊ शकतो.
मात्र सध्या मिळणारा ₹9,900 महागाई भत्ता गेला, तर वास्तविक वाढ मर्यादित राहते.
ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पे ₹50,000 आहे, त्यांना नवीन स्ट्रक्चरनुसार ₹90,000 पर्यंत पगार मिळू शकतो.
पण ₹27,500 DA घटक काढून टाकल्यावर, निव्वळ वाढ केवळ ₹77,500 ते ₹90,000 इतकीच होते.

तज्ज्ञांचे मत काय?

तज्ज्ञांच्या मते, कागदावर ही वाढ जरी मोठी दिसत असली, तरी प्रत्यक्षात याचा परिणाम DA पुनर्रचना कशी होते यावरच अवलंबून असेल. सरकार नवीन DA रचना जशी स्वीकारते त्यावरच मूळ पगारवाढ किती उपयुक्त ठरेल हे स्पष्ट होईल.

कर्मचारी संघटनेचा विरोध

JCM (राष्ट्रीय परिषदेच्या संयुक्त सल्लागार समिती) च्या कर्मचारी सदस्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, त्यांची किमान मागणी 2.57 फिटमेंट फॅक्टर चीच आहे. जी 7व्या वेतन आयोगात होती. त्यामुळे 1.8 फॅक्टर स्वीकारणे त्यांना मान्य नाही. सध्या सरकार 8व्या वेतन आयोगाचे औपचारिक गठन लवकरच करेल अशी शक्यता आहे आणि 2026 पर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकते.

Disclaimer: वरील माहिती विश्वसनीय माध्यमांवर आधारित आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात अंतिम निर्णय केंद्र सरकारच घेणार असून यामध्ये बदल होऊ शकतो. कोणतीही आर्थिक किंवा धोरणात्मक कृती करण्याआधी अधिकृत सूत्रांकडून खात्री करून घ्यावी.

FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. 8वा वेतन आयोग कधी लागू होणार आहे?
सरकारकडून अद्याप औपचारिक घोषणा झालेली नाही, परंतु 2026 मध्ये अंमलबजावणीची शक्यता आहे.

2. नवीन फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो?
अहवालानुसार 1.8 चा फॅक्टर ठरू शकतो, जो पूर्वीच्या 2.57 पेक्षा कमी आहे.

3. पगार वाढून किती होईल?
सध्याचा किमान पगार ₹18,000 ते सुमारे ₹32,000 पर्यंत जाऊ शकतो, पण DA काढून टाकल्यामुळे खरी वाढ कमी राहील.

4. कर्मचारी संघ काय म्हणत आहेत?
त्यांनी 2.57 फिटमेंट फॅक्टरची किमान मागणी केली असून 1.8 फॅक्टरवर ते नाराज आहेत.

5. DA शून्य का होईल?
नवीन सैलरी स्ट्रक्चरमध्ये DA पुन्हा 0% पासून मोजला जाईल, म्हणून सध्याचा DA हटवण्यात येतो.

Follow Us On

Tr. Shubhangi Shinde

Tr. Shubhangi Shinde

मी Tr. शुंभांगी शिंदे, पुण्याहून असून गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी नोकरी, शासकीय योजनांवरील माहिती आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बदलते नियम, नवीन GR, पगारवाढ ,DA, 8th pay commission, सेवा शर्ती, ट्रान्सफर अपडेट्स आणि निवृत्तीविषयक योजनामध्ये तज्ज्ञ म्हणून काम करते. माझा उद्देश असा की प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अचूक, खात्रीशीर आणि वेळेवर सरकारी माहिती पोहोचवावी, यांना योग्य मार्गदर्शन देणे हे माझे ध्येय आहे.

Leave a Comment