RRB Bharti 2025 रेल्वे भर्ती मंडळ (RRB) मार्फत एकूण 6238 पदांची मोठी भरती अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवड पद्धत यासह सर्व आवश्यक माहिती आणि PDF जाहिरात व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
रेल्वे भर्ती मंडळ भरतीचे तपशील:
पदाचे नाव: Technician Grade-I (Signal) व Technician Grade-III
एकूण पदसंख्या: 6238
Technician Grade-I (Signal): 183 पदे (लेव्हल-5)
Technician Grade-III: 6055 पदे (लेव्हल-2)
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 जून 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 जुलै 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 30 जुलै 2025
अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी विंडो: 01 ते 10 ऑगस्ट 2025
अर्ज कसा कराल?: या भरतीसाठी फक्त ऑनलाईन अर्ज मान्य करण्यात येतील. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता:
संबंधित पदासाठी ITI / Course Completed Act Apprentice प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
पदवी किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार पात्र मानले जाणार नाहीत.
वयोमर्यादा (01 जुलै 2025 नुसार)
Technician Grade-I (Signal): 18 ते 33 वर्षे
Technician Grade-III: 18 ते 30 वर्षे (शासन नियमानुसार राखीव प्रवर्गांना सवलत उपलब्ध)
परीक्षा शुल्क:
सामान्य प्रवर्ग: ₹500 (CBT ला उपस्थित राहिल्यास ₹400 परत मिळणार)
SC/ST/महिला/EWS/EBC/ExSM/PwBD: ₹250 (CBT ला उपस्थित राहिल्यास संपूर्ण ₹250 परत)
वैद्यकीय पात्रता: पदानुसार A3, B1, B2 आणि C1 वैद्यकीय मानके लागू असणार. यामध्ये दृष्टी आणि शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे.
निवड प्रक्रिया
CBT परीक्षा (नकारात्मक गुणपद्धती लागू प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
राष्ट्रीयत्व अट: उमेदवार भारत, नेपाळ, भूतानचे नागरिक असावेत किंवा भारतात कायमस्वरूपी स्थायिक झालेली पात्र व्यक्ती असावी.
Disclaimer: वरील माहिती अधिकृत RRB जाहिरात व उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. कोणतीही माहिती किंवा निर्णय घेण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1: RRB Technician भरतीसाठी पदवीधर अर्ज करू शकतात का?
नाही, फक्त ITI पात्रता असणारे उमेदवारच अर्ज करू शकतात.
Q2: परीक्षा फी परत कधी मिळते?
CBT परीक्षा दिल्यास परतफेड केली जाते.
Q3: एकपेक्षा जास्त अर्ज करू शकतो का?
नाही, फक्त एकाच पे लेव्हलसाठी अर्ज मान्य.
Q4: शारीरिक चाचणी लागते का?
नाही, पण वैद्यकीय फिटनेस तपासणी आवश्यक आहे.
Q5: CBT मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
होय, 1/3 गुण वजा केले जातील प्रत्येक चुकीसाठी.