पाटबंधारे विभागात या पदांवर सरकारी नोकरीची संधी ही शेवटची तारीख! Patbandhare Vibhag Bharti 2025

Published On:
पाटबंधारे विभागात या पदांवर सरकारी नोकरीची संधी ही शेवटची तारीख! Patbandhare Vibhag Bharti 2025

Patbandhare Vibhag Bharti 2025 पाटबंधारे प्रकल्प मंडळात रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. ही भरती तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त अभियंत्यांसाठी ही सुवर्णसंधी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा, कारण अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जुलै २०२५ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

भरती करणारा विभाग: पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे

भरती प्रकार: कंत्राटी पद्धती

पदाचे नाव: सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)

पदसंख्या: एकूण ४ पदे

नोकरीचे ठिकाण: धुळे

शैक्षणिक पात्रता: संबंधित विभागातून सेवानिवृत्त असलेला अधिकारी आणि किमान ३ वर्षांचा अनुभव असावा

वयोमर्यादा: केवळ सेवानिवृत्त अधिकारीच पात्र

नियुक्ती कालावधी: सुरुवातीला ११ महिने, गरज पडल्यास वाढवू शकते

पाटबंधारे विभाग भरती 2025

सेवा लाभ: नियमित शासकीय सेवेसारखे लाभ मिळणार नाहीत

निवड प्रक्रिया: पात्र उमेदवारांना ई-मेल/मोबाईल SMS द्वारे मुलाखतीसाठी कळवले जाईल

अर्जाची पद्धत: फक्त ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साक्री रोड, धुळे – ४२४००१

पाटबंधारे विभाग भरती आवश्यक अटी

अर्जदारांनी Rs.100/- स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल की सेवा समावेशाचा कोणताही हक्क मिळणार नाही.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून अनिवार्य.|अर्ज करताना अधिकृत जाहिरात नीट वाचूनच सादर करावा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • सेवा निवृत्ती प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आरोग्य प्रमाणपत्र (जिल्हा शल्यचिकित्सक)
  • स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

Disclaimer: वरील सर्व माहिती ही अधिकृत भरती जाहिरात आणि वेबसाईटवर आधारित आहे. अर्ज करण्याआधी कृपया अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती प्रक्रियेमध्ये कुठलीही बदल किंवा तांत्रिक अडचण आल्यास आमची कोणतीही जबाबदारी राहणार नाही.

FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. ही भरती कोणासाठी आहे?
ही भरती केवळ जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त अभियंत्यांसाठी आहे.

2. अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?
२९ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येईल.

3. अर्जाची पद्धत काय आहे?
अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.

4. या पदासाठी कोणते फायदे मिळतात?
केवळ करार पद्धतीने नियुक्ती असून शासन सेवा समावेशाचे कोणतेही हक्क नसतील.

5. अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?
wrd.maharashtra.gov.in या ई-जलसेवा संकेतस्थळावर पाहता येईल.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Follow Us On

Komal Shelke

Komal Shelke

Leave a Comment