Konkan Railway Bharti 2025 कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत Track Maintainer आणि Points Man या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 79 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 23 जुलै 2025 पासून 12 ऑगस्ट 2025 दरम्यान अधिकृत वेबसाइटवरून अर्ज सादर करता येईल. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून, उमेदवारांनी अर्ज करताना मूळ जाहिरात नीट वाचावी.
कोकण रेल्वे भरती 2025 माहिती
भरती करणारी संस्था: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL)
पदाचे नाव: ट्रॅक मेंटेनर (35 पदे) व पॉइंट्समन (44 पदे)
एकूण पदे: 79
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता: किमान दहावी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त मंडळांकडून)
वेतन: दरमहा ₹18,000/-
वयाची अट: 18 ते 45 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)
अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्जाची सुरुवात: 23 जुलै 2025
अंतिम तारीख: 12 ऑगस्ट 2025
अधिकृत संकेतस्थळ: www.konkanrailway.com
निवड प्रक्रिया कशी असेल?
कोकण रेल्वे भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
– Computer Based Test (CBT)
– कागदपत्र तपासणी (Document Verification)
– शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
– वैद्यकीय तपासणी
अर्ज फी आणि वयोमर्यादा
अर्ज फी: ₹885/- (SC/ST उमेदवारांसाठी सवलतीस पात्र)
वय मर्यादा: किमान 18 वर्षे आणि कमाल 45 वर्षे
वयात सवलत:
- माजी सैनिक (UR/EWS): 3 वर्षे
- SC/ST उमेदवार: 5 वर्षे
- माजी सैनिक (SC/ST): 8 वर्षे
ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 23 जुलै 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 12 ऑगस्ट 2025 |
Disclaimer: वरील माहिती ही अधिकृत जाहिरात, संकेतस्थळ आणि विविध माध्यमांमधून संकलित केलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी Konkan Railway च्या अधिकृत संकेतस्थळावरील मूळ जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. आम्ही केवळ माहिती पुरवतो, निर्णयाची अंतिम जबाबदारी संबंधित अधिकृत संस्थेची आहे.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. कोकण रेल्वे भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
किमान 10वी पास असणे आवश्यक आहे.
2. अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने www.konkanrailway.com या संकेतस्थळावर करावा लागेल.
3. एकूण किती पदांसाठी भरती आहे?
79 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे.
4. निवड प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमधून होणार आहे?
CBT, कागदपत्र तपासणी, PET, आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांतून निवड केली जाईल.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे.